HW News Marathi
महाराष्ट्र

रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन TRP वाढवला, असत्यमेव जयते ! संजय राऊतांचे ट्विट

मुंबई | मुंबई पोलिसांनी चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी या टीआरपी रॅकेटच्या पत्रकार परिषदेची माहिती देताना रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा आरोप केला आहे. तसेच असत्यमेव जयते असे म्हणत रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याची माहिती दिली आहे. असत्यमेव जयते.” मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात त्यांनी बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याची माहिती दिली. या माध्यमातून ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाल्याचंही त्यांनी नमूद मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नमूद केलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk

‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या’, मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता आनंद महिंद्रांना टोला

News Desk

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”, मनसुख हिरेनच्या मृत्यूवरुन चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल  

News Desk