HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांना धक्का! भाजपा चे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात.. जिल्हा बँकेसंदर्भात राष्ट्रवादी च्या बैठकीस हजेरी..

बीड | भाजपमधील बीडचे माजी आमदार तथा पंकजा मुंडे चे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली.यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडेना धक्का समजला जात आहे .भाजपाच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अगोदरच बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची पीछेहाट होत असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे या बैठकीमध्ये केशव आंधळे यांनी तीन मिनिटाचे भाषण ठोकले .यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे , आ.संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यामुळे भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा असून लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. माजी आमदार केशव आंधळे हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष होते तसेच ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी आता या माजी आमदारांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आज च्या राष्ट्रवादीच्या बैठकीला माजी आमदारांची हजेरी हे त्याचे उदाहरण आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपाला हवं तेवढं यश मिळवता आलं नाही ,आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पीछेहाट होत असल्याने भाजपची व बीड मधील पंकजा मुंडे ची ताकत कमी तर होत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. या निवडणुकीचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच सहकारी संस्थांमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ,परळी वैजनाथ बँक यांच्या निवडणुका देखील या कालावधीमध्ये होणार आहेत.त्या दृष्टिकोनातून पंकजा मुंडे यांनी या संदर्भात ठोस भूमिका नाही घेतली तर भविष्यात या निवडणुका भाजपला जड जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर जिल्ह्यात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप

News Desk

‘पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या नेमप्लेटवर शाईफेक!’

News Desk

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Atul Chavan