HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसची विधान परिषदेची ऑफर उर्मिला मातोंडकरने नाकारली, कॉंग्रेसचा स्फोट

मुंबई | राज्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावावरून जोरदार चर्चा सुरू आहे. या नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचीही चर्चा होतेय. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याचीही चर्चा होती. नंतर शिवसेनेची ऑफर त्यांनी स्वीकारल्याचही म्हचले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसने विधान परिषदेसाठी ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली असं त्यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

वडेट्टीवार म्हणाले, मातोंडकरांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. मात्र त्यांनी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. उर्मिला मातोंडकर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना राणावतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीर पत्नींसाठी आजीवन मोफत एसटी प्रवास

News Desk

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

News Desk