HW News Marathi
देश / विदेश

आता लॅपटॉप बॉम्बचा जगाला धोका,

 

वृत्तसंस्था। अल कायदा आणि आयएस या दहशतवादी संघटनांनी विशेष प्रकारचे बॉम्ब तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हे बॉम्ब केवळ लॅपटॉप नव्हे तर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणातही बसवता येणार आहेत. याच कारणास्तव अमेरिका आणि ब्रिटनने ८ मुस्लिम बहूल देशातील रहिवाशांना विमानातून प्रवास करताना इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अतिरेकी संघटना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने विमानात स्फोट घडवून आणण्याची भीती असल्याची खबर गुप्तचर विभागाने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने म्हटल्याचं सीबीएस न्यूजचं म्हणणं आहे. अतिरेक्यांचे पुढचे टार्गेट विमाने असल्याने एफबीआयच्या तज्ज्ञांनी अनेक प्रकारच्या लॅपटॉप बॉम्बचे परिक्षण केले आहे. विमानतळावरील स्कॅनर्स मशीनद्वारे हे लॅपटॉप बॉम्ब डिटेक्ट होतात की नाही हे पाहण्यासाठीच एफबीआयने ही चाचणी केल्याचं सांगण्यात येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ नावांची घोषणा राज्यपालांनी लवकरात लवकर करावी, अन्यथा…!

Gauri Tilekar

या निर्णयामूळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वचनबद्धता सिद्ध होते- लालकृष्ण अडवाणी

News Desk

#NirbhayaCase : निर्भयाच्या आरोपींना २२ जानेवारीला फाशी नाही

swarit