HW News Marathi
देश / विदेश

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

नवी दिल्ली | हवाई वाहतूक गैरव्यवहार प्रकरणी माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज (११ जून) पुन्हा अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात (ईडी) हजेरी लावली आहे. पटेलांनी काल (१० जून) ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने पटेलांना या प्रकरणी १ जून समन्स बजावले होते. यानंतर ६ जूनला चौकशीसाठी कार्यलायात हजर राहण्यासाठी सांगितले होते.

परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला गैरहजर राहणार असल्याची पटेल यांनी सांगितले होते. पटेलांनी चौकशीसाठी दुसरी तारीख देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर ईडीने १० किंवा ११ जून रोजी हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले होते. पटेल काल आणि आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहिले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण

हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात असून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी ईडीने सुरू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुरामध्ये मोदी सरकारचा विजयरथ

News Desk

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकते

News Desk

महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचं डिजिटल आंदोलन, #मोदी_मतलब_महंगाई  हॅशटॅग होणार ट्रेंड 

News Desk