HW News Marathi
देश / विदेश

भारतीय अंतराळवीर आता जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

मॉस्को | भारताची अंतराळ संशोधन इस्रोचा एक अंतराळवीर आता थेट पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकणार असल्याची माहिती मिळत आहे. “२०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर सोयूझ या रशियाच्या यानातून २०२२ साली भारतीय अंतराळवीर स्थानकावर रवाना होणार आहे”, असे रशियन अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे. आता पर्यंत पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अमेरिका, रशिया, जपान यांसारख्या देशांचे अंतराळवीर जाऊन आलेले आहेत.

भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ २०२२ साली आपला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या मोहिमेच्या आधी किंवा नंतर एखाद्या भारतीय अंतराळवीराला अंतराळ स्थानकावर पाठवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेतील राहण्यास योग्य असे कृत्रिम उपग्रह आहे. ‘२०२२ सालापर्यंत इस्रो आपले अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे’, असे इस्त्रोचे अध्यक्ष के.शिवन यांनी सांगितले होते.

देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी “२०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली होती. ‘भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अंतराळात घेऊन जाणे हे इस्रोचे लक्ष्य आहे. पण त्याचबरोबर या मोहिमेद्वारे देशभरात १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे’, अशी माहितीदेखील इस्रोचे अध्यक्ष के. शिवन म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

News Desk

ज्येष्ठ नागरिकांमधील ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

swarit

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

Arati More
राजकारण

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit

नवी दिल्ली | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाचही राज्यात निवडणुकीची घोषणा होताच आज (६ ऑक्टोबर)पासून आचारसंहिता देखील लागू झाली असून या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे. या पाचही राज्यांमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाणून घ्या…पाच राज्यात कशाप्रकारे निवडणुका होणार

छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर तेलंगला आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे.

 

२०१३मध्ये या पाच राज्या किती मते मिळाली

२०१३च्या विधानसभा निवडणुकीत १६५ जागांनी भाजपला बहुमत मिळाले होते. विधानसभेत एकूण २३१ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ५७ तर बसपाचे चार आमदार आहेत. मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत.

राजस्थान

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २०० आहे. २०१३ साली निवडणुकीत भाजपने १६० जागांवर विजय मिळवत त्यांनी बहुमत मिळवले होते.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये ९१ एकूण सदस्यसंख्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपने २०१३ मध्ये ४९ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने ३९ आमदार होते.

तेलंगणा

तेलंगणात एकूण – ११९ सदस्यसंख्या असून विधानसभेच्या निवडणुकीत टीआरएसने – ९०, काँग्रेस – १३, एमआयएम-७, भाजप-५, टीडीपी – ३ आणि सीपीआय (एम)ने – १ जागांवर विजय मिळवला होता.

 

मिझोराम

मिझोराममध्ये ४० सदस्यसंख्या असलेले राज्य असून काँग्रेसच्या हातात असलेले हे एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३४ जागा असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती.

Related posts

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

News Desk

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

News Desk

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk