HW News Marathi
देश / विदेश

नको ‘त्या’ आवस्थेत दिसलेल्या बॉयफ्रेंडवर महिलेचा चाकूहल्ला

क्लिव्हलॅँड- येथील एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडवर पाच ते सहा वेळा चाकुहल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. त्याचे कारण म्हणजे या बॉयफ्रेंडने त्या महिलेच्या मुलीवरच मध्यरात्री दोनच्या सुमारास नको ते करण्याचा प्रयत्न केला. त्याने बारा वर्षीय मुलीचे कपडे काढून तिच्या अंगावर नग्न आवस्थेत उभा असल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. सुरुवातीला हा सर्व प्रकार पाहून तिला धक्काच बसला. आपला बॉयफ्रेंड मुलीसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे तिच्या लक्षात येताच तिचा संतापाचा कडेलोट झाला. तिने काही कळण्याच्या आत त्या नराधम मित्रावर चाकुने सपासप वॉर केले. पाच वॉर त्याच्या छातीवर केले तर एक वॉर मानेवर केला. यात तो जखमी झाला. त्यानंतर महिलेने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या नराधम मित्राला अटक केली. 12 वर्षाच्या मुलीविषयी त्याला आकर्षण वाटत होते. तो तिचा वारंवार लैंगिक छळ करत असे. असे मुलींने आईला सांगितले. त्या नराधमावर लैंगिक अत्याचाराच्या अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या घटनेमुळे महिला व तिची मुलगी यांना मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह दिल्लीहून कोकणासाठी रवाना!

News Desk

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आठ वाजता करणार देशाला संबोधित

News Desk

बंगळूरू मध्ये सोशल मिडीयावरील पोस्टमुळे हिंसाचार, ३ जणांचा मृत्यु तर ६० पोलीस जखमी

News Desk
देश / विदेश

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

फ्लोरिडा-फ्लोरिडामध्ये नुकतेच आलेल्या इरमा वादळ्याने या परिरसराची भौगोलिक ओळख पुसून टाकली आहे. परिसरातील नव्वद टक्के घरे उध्वस्त झाली आहेत. सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नागरिक आपल्या घराकडे परतु लागले आहेत. परंतु घरं भूईसपाट झाल्याचे पाहून अनेकांना आश्रु आले. परिसरातील सर्व घरे अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. एकही घर शिल्लक नाही. जे शिल्लक आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे घरी परतुन राहायचे कुठे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. मालमत्तेसोबत घरातील अनेक मौल्यवान वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. कार, वाहने यांचेही नुकसान झाले आहे. एकूणच या वादळाने सर्वस्व उध्वस्त केल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वादळ शमले असले तरी त्याच्या कटू आठवणीतून बाहेर येण्यासाठी कित्येक वर्ष द्यावी लागणार आहेत. सध्या घरांची दुरूस्ती करून निवारा निर्माण करण्यावर येथील नागरिक भर देत आहेत. दरम्यान, घरी परतलेल्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. वादळात वीजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. तो पूर्ववत होत नसल्याने नागरिकांनी गर्मीने हाल सुरू आहेत.

Related posts

राष्ट्रवादीविरोधात आता शिवसेनेची नाराजी ! खासदाराने दिला राजीनामा…

News Desk

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

News Desk

काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन; यात्रा तात्पुरती स्थगित

Aprna