HW News Marathi
राजकारण

आता वेळ सिमोल्लंघनाची, तयारी करा !

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शाही सिमोल्लंघनाची तयारी करण्याची सूचना केली आहे. “सातारच्या जनतेचा मला खंभीर पाठिंबा आहे. आता वेळ सिमोल्लंघनाची आहे, त्याची तयारी करा,” असे उदयनराजेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जलमंदिर पॅलेस येथे सातारा विकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शाही सिमोल्लंघानाचा आग्रह धरला होता. त्यावेळी उदयनराजेंनीही ‘मी आहेच, तुम्हीही या’ असे म्हणत कार्यकर्त्यांना शाही सिमोल्लंघनाचे निमंत्रण दिले आहे.

या शाही सिमोल्लंघनाच्या माध्यमातून उदयनराजे भोसले राजकीय नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हटले जात आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष आहे. आता उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना केलेल्या सीमोल्लंघनाच्या सूचनेनंतर याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळालं! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्‍ली में जगाया AAP ने, पहले तो यहां ऑक्‍सिजन था !

swarit

महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

Aprna
व्हिडीओ

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची लोककला लावणीच्या माध्यमातून जपणाऱ्या ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडे यांनी नवरात्री निमित्त एच.डब्ल्यू.मराठीशी खास बातचीत केली आहे. बालपण, शिक्षण आणि कला याविषयी त्यांनी विशेष बातचीत केली आहे. वयाच्या ७ व्या वर्षी आई लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगला यांनी तमाशाच्या बोर्डावर नाचायला सुरुवात केली. आज वय वर्षे ६७ असतानाही त्या तितक्याच उत्साहात लावणी करताना पाहायला मिळतात. मंगला बनसोडे यांची या कलाक्षेत्रात ५ वी पिढी आहे. तसेच खानदानात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या मंगला बनसोडे या ३ ऱ्या कलाकार आहेत. मंगला बनसोडे या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या कन्या तर वगनाट्यकार आर एल बनसोडे यांच्या पत्नी आहेत.

Related posts

किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार! – Anil Parab

News Desk

Nitin Gadkari | सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही

swarit

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

News Desk