HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर

मुंबई | मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसेपाटील यांनी केली. आमदार दिलीप वळसे यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने सचिन अहिर यांची मुंबई अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२०२० अशी पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून या निवडणूकीचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमदार दिलीप वळसेपाटील यांनी काम पाहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते | मोहन भागवत

News Desk

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk