HW News Marathi
राजकारण

न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे !

नवी दिल्ली । राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसऱ्याला झालेल्या सभेमध्ये राम मंदिरासाठी कायदा तयार अशी मागणी केली होती.परंतु या मुद्द्यावर भाजपा नेत्यांनी मौन धारण केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे, अशी भाजपाची भूमिका आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयत्न करत आहेत. परंतु मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने न्यायालयीन निर्णय येण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सरकार न्यायालयीन निर्णयाची वाट पाहत आहे.संघप्रमुखांच्या मागणीवर भाजपाच्या कोअर समितीच्या बैठकीत विचार होणार आहे. सहा ज्येष्ठ सदस्यांची समावेश असलेल्या समितीची बैठक लवकरच होणार आहे. न्यायालयीन निर्णयाची वाट पाहावी, असा पक्षाचा दृष्टिकोन असला तरी सरसंघचालकांच्या सूचनेचाही योग्य सन्मान करण्यात येईल, असे एका नेत्याने सांगितले.

मोहन भागवत यांनी दसऱ्याच्या सभेमध्ये नेमके काय म्हटले

राम मंदिरसाठी कायदा करा असा ही प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा ,राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलत असताना, भागवत यांचा कल भाजपाकडे होता. जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठरवावे . ‘नोटा’चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले. पक्षीय आणि जाती-पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा, भागवत यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Aprna

व्यंगचित्राची कमाल, बुरा न मानो दिवाली है !

News Desk

#Vidhansabha2019 | वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक माघार घेणार ?

News Desk
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

News Desk

मुंबई | गणेशोत्सव जवळ आला आहे. आणि मुंबईतील बाजारात इकोफ्रेंडली गणपती आणि मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. यासाठी मागील काही वर्षांपासून नाहर ग्रुप तर्फे इकोफ्रेंडली गणपती आणि मखरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे ‘गो ग्रीन’ चा संदेश देण्याची प्रथा यंदा ही सुरु ठेवली आहे. नाहर ग्रुपने त्यांच्या ‘अवर ग्रीन गणेशा’ या इनिशिएटिव्हसाठी मुंबईतील चांदिवली येथे नाहर इंटरनॅशनल स्कुलमध्ये ६ , ७ सप्टेंबर रोजी दोन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. इको डेकॉर व ग्रीन गणेशा बनविण्यासाठी असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये नाहरच्या अम्रित शक्ती टाउनशिप मधील २०० रहिवाश्यांनी सहभाग घेतला.

पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)ला समुद्र देखील स्वीकार करत नाही. ज्यामुळे विसर्जनानंतर समुद्री जीवांना आणि पर्यावरणाला नुकसान होतं. त्याचा वापर न करता शाडू मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती व मखरांची सजावट बनविण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts

‘नाशिकचा मी आशिक’ चा टिझर लॉन्च

News Desk

“निष्ठावान कलातपस्वी हरपला”; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk