HW News Marathi
मुंबई

विसर्जन मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू

मुंबई | दादर चौपाटीजवळ काल (गुरुवार) रात्री १. ३० वाजताच्या सुमारास देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत जोरदार भांडण झाले होते. भांडण इतके विकोपाला गेले की या भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि या दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काल अनेक सार्वजनिक मंडळांच्या देवीचा विसर्जन सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्याला दादर परिसरात गालबोट लागले आहे. मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणूक दादर चौपाटीवर येत असताना या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादात जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश अशोक नलावडे (वय १९) आणि स्टेलिन यशवंत पुजारी (वय १९) यांनी बेदम मारहाण केली आहे.

ही घटना काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास सी ५ लेन येथे घडली आहे. त्यानंतर घटनास्थळी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक पोहचले आणि गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. त्यावेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टेलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली आहे. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युवासेनेनं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं

News Desk

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

News Desk

खड्ड्यांविरोधात तुर्भेच्या पीडब्लूडी कार्यालयात मनसेचे खळखट्याक

News Desk
देश / विदेश

शबरीमालामध्ये महिलांना ‘प्रवेश’च नाही

swarit

तिरुवनंतपूरम । शबरीमाला येथील अय्यपा मंदिरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुला करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ केरळमध्ये तणावाचे वातावरण आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आणि महिला पत्रकार कवीथा जक्कल या दोन महिला हेल्मेट घालून पोलिसांचे संरक्षण घेऊन त्या मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत गेल्या होत्या. परंतु या दोघींनाही मंदिरात प्रवेश करताच आला नाही. पोलिसांना निषेध करणाऱ्यांना रोखता आले नाही. त्यामुळे त्यांना दोघी निराश होऊन पुन्हा परतल्या.

महिलांनी परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारे बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. माझा भक्तांना पाठिंबा आहे. मंदिराला कुलूप लावून चाव्या द्यायच्या आणि येथून निघून जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याशिवा कोणातही पर्याय नाही, असे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी सांगितले.

काल केरळमध्ये जमाव बंदी करण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ गुरुवारी शबरीमाला संरक्षत समिती आणि विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पुकारला होता. बंदामुळे बस आणि रिक्षा सेवा ठप्प झाल्या होत्या.शबरीमालाकडे जाणा-या निलक्कल आदी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया, भाजप आणि एनडीएतील घटक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता.

Related posts

भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ

Manasi Devkar

आयपीएलमध्ये खेळण्यासाठीच कोहलीने विश्रांती घेतली, ब्रॅड हॉजचा आरोप

News Desk

मध्य प्रदेश: व्यापमं घोटाळ्यातील आणखी एका आरोपीची आत्महत्या

News Desk