HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ यांना दिलासा

मुंबई | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पीएमएलए न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष पीएमएलए कोर्टाने भुजबळ यांना ६ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचा निर्णय दिला आहे. भुजबळ यांना पर्सनल बाँड भरण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपावरुन दोन वर्षापासून छगन भुजबळ हे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. ४ मे रोजी भुजबळ यांना ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांवर आधीच आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ‘ईडी’ने म्हटले होते आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी -शिवसेना -भाजप नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता ? संजय राऊत!

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी १७ मार्चला होणार

swarit

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

Aprna
देश / विदेश

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

वी दिल्ली- आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. चार वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. मात्र, अद्याप पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले असून त्यानंतरच आसाराम बापुच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

76 वर्षीय आसाराम बापुने 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

Related posts

सुनावणीसाठी न्यायालयात जाणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

News Desk

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

News Desk

कृषी कायदा रद्द होणार नाही अमित शाहांनी केले स्पष्ट, तर आजची होणारी बैठकही रद्द

News Desk