HW News Marathi
Covid-19

“अनिल देशमुख तुम्ही मंदिर भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का ?” भाजपने डिवचलं

मुंबई | मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष केले आहे. “गृहमंत्री अनिल देशमुख तुम्ही एका मंदिराचे भूमिपजन करणार आहेत. पण त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली आहे काय?”, असा खोचक सवाल तुषार भोसले यांनी केला आहे.राज्यातील मंदिर खुली करण्याच्या मागणीवरून भाजप चांगलीच आक्रमक झाली असून ट्विटरच्या त्यांनी माध्यमातून हा टोला लगावला आहे.

“अनिल देशमुख आज एका मंदिराचे भूमिपूजन करत आहेत, ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतलीत का ? कारण ‘काहींना वाटतं की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल !’ आणि ‘ई भूमिपूजन’ करावे अशी या आपल्या नेत्यांची अनुक्रमे मते आहेत”, असे ट्विट तुषार भोसले यांनी केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता सरकार आणि विरोधात पक्षात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख कोणत्या मंदिराचे भूमिपूजन करणार ?

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराचे आज (१ नोव्हेंबर) अनिल देशमुख यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे. खेतिया रस्त्यावर मोहिदेतर्फे हवेली शिवारात श्री विष्णूपुरम तीर्थाच्या पाया भरणीनिमित्त अधिष्ठान महापूजा आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून ही टीका करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी , महाराष्ट्रात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु

Arati More

मानलं राव! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिवीर उत्पादनाचा परवाना

News Desk

‘एन-95’ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे

swarit