HW News Marathi
महाराष्ट्र

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते शिवसेनेत करणार प्रवेश

सोलापूर | राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूरमध्ये भगदाड माजी पाणीपुरवठामंत्री आणि बार्शी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल सोपल लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सोपल यांच्या पाठोपाठ करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत प्रवेशासाठी जोरदार इनकमिंग सुरू असल्याच चित्र सध्या बघायला मिळत आहे. शिवसेना नेते व दिग्विजय बागल यांचा एकत्र फोटो टाकत त्याचे फेसबुक पोस्ट व्हायरल होऊ लागलेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

द्विग्विजय यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “लोकसभा निवडणुकीत उत्तम काम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याची कदर करण्यात आली नाही. पक्षाने मला डावलले, राष्ट्रवादीत कामाची कदर नाही,” असा आरोप करण्यात आला आहे. यानंतर सोमवारी (१९ ऑगस्ट) बागल गटाने कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके काय म्हटले फेसबुक पोस्टमध्ये

शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे. यावर रश्मी दिदींना अनुमती देण्यासाठी बागल गटावर प्रेम करणाऱ्या, खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या, निष्ठावान आणि प्रामाणिक पणे कोणत्याही परिस्थितीत बागल गटाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी दिनांक (१९ ऑगस्ट) सकाळी १० वाजता बागल संपर्क कार्यालयात यावे. सर्वांना ही नम्र विनंती करणारी अशी पोस्ट रश्मी बागल यांचे धाकटे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकवर टाकली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणाले, अभिमान तर असेल, पण…

News Desk

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील- संजय राठोड

News Desk

कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही! – जितेंद्र आव्हाड

Aprna