HW News Marathi
देश / विदेश

विरेंद्र सेहवाग प्रशिक्षकपदासाठी फेवरिट ?

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, रिचर्ड पायबस यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. बीसीसीआयनं क्रिकेट सल्लागार समितीला आणखी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सांगितलं आहे.

अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयनं त्यांचा पर्याय शोधायला सुरूवात केलीय. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्यानं अर्ज करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कुंबळे यांची कामगिरी चांगली होती, ते अचानक राजीनामा देतील असं वाटलं नव्हतं, त्यामुळं कुणी यापदासाठी अर्जच केला नव्हता, असं बीसीसीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, कुंबळेंनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आता चित्र बदललं आहे. त्यामुळं या जागेसाठी आता अनेकजण इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विरेंद्र सेहवाग हाच सध्यातरी फेवरिट असून मात्र, याबाबतचा निर्णय सल्लागार समितीच काय तो अंतिम निर्णय घेईल, असंही सूत्रांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात 5.5 इंच पावसाची नोंद

News Desk

काश्मीरमध्ये निपाणीचा जवान शहीद

News Desk

रघुराम राजन यांना अर्थशास्रातील नोबेल ?

News Desk