HW News Marathi
देश / विदेश

हे होते लायन एअरवेजच्या विमानाचे पायलट

नवी दिल्ली । इंडोनेशियातील लायन एअरवेजचे विमान आज (२९ ऑक्टोबर) उड्डाणानंतर समुद्रात कोसळले आहे. लायन एअरवेजचे बोईंग ७३७ जेटी ६१० हे विमान दिल्लीचे ३१ वर्षीय वैमानिक भव्य सुनेजा उडवत होते. भव्य सुनेजा हे दिल्लीतील मयूरविहारचे रहिवासी होते. त्यांचे शिक्षण एल्कॉन पब्लिक स्कूलमधून झाले होते. २००९मध्ये त्यांना वैमानिकाचा परवाना मिळाला. अमिरातमध्ये ते ट्रेनी होते. सात २०११ वर्षांपूर्वी मध्ये भव्य लायन एअरवेजमध्ये रुजू झाले होते. हरविनो हे त्यांचे सह वैमानिक होते.

लायन एअरवेजच जेटी ६१० विमान समुद्रात कोसळल्याची माहिती इंडोनेशिया सरकारने दिली आहे. उड्डाणानंतर अवघ्या १३ मिनिटाने विमानाशी संपर्क तुटला होता. या विमानाने जर्काताहून पँगकल पिनांगकडे जाण्यासाठी उड्डाण घेतली होते. जकार्तामधून या विमाने सकाळी ६.३३ मिनिटाने उड्डाण केले होते. इंडोनेशियातील प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या विमानामध्ये १८८ प्रवासी प्रवास करत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत

News Desk

नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात ‘सरेंडर मोदी’ | राहुल गांधी

News Desk

नमाज चालतो, जन्माष्टमी का नाही? – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk