HW News Marathi
राजकारण

अंतर्गत चर्चा करून राऊतांनी वक्तव्य केले असेल!

मुंबई | ‘संजय राऊत यांनी जे विधान केलेले आहे. त्यांनी अंतर्गत चर्चा करून केलेले आहे, पाहू काय होतय ते,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. एकनाथ शिंदेंनी आज (23 जून) गुवाहाटी येथील 47 आमदार त्यांच्यासोबत असल्याचे शक्ती प्रदर्शन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आत ते म्हणाले, “शिवसेनेने जर महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे वाटत असेल तर तुम्ही सर्वांनी 24 तासात मुंबईत परत या. आणि तुमची मागणी पक्षप्रमुखांसमोर मांडावी,” असे आवाहन त्यांनी बंडखोर नेता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना केले आहे. यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

जयंत पाटील म्हणाले, “सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावे लागणार आहे. त्याबद्दल नवीन असे काही नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी जे विधान केलेले आहे. त्यांनी अंतर्गत चर्चा करून केलेले आहे, पाहू काय होतय ते.” शिवसेनेने पक्ष वाचवण्यासाठी अशी भूमिका घेतली का?, पत्रकारांच्या ‘या’ प्रश्न जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेचा आतापर्यंतचा इतिहास असा आहे.  अनेकांनी पक्ष सोडला आणि पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आमदाराबरोबर नसतात. तर पक्षाबरोबर असतात. शिवसैनिकांनी अनेकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेला आमदार किती आहे. याची आज चिंता करण्याची गरज नाही. सरकार राहण्यासाठी जी संख्याबळ आहे. ते ठिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून राहण्यासाठी काय निर्णय घेतला तर ते आपल्याला कळवितील. पण आता जे जाहीर विधान केलेले आहे. ते मी थोड्या वेळा पूर्वीच पाहिले. त्यावर आम्ही अंतर्गत काही विचार केलेला नाही.”

“आमचे विधानसभा, विधानर परिषद, राज्यसभा, लोकसभेचे सर्व सदस्य आणि पक्षाचे प्रमुख सदस्य यासर्वांना सध्याची परिस्थिती काय आहे. हे सांगण्यासाठी  ही आजची बैठक आहे. आणि पाच वाजता ही बैठक सुरू होणार आहे,” राष्ट्रवादीच्या बैठकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पाटील बोलत होते.

उद्धव ठाकरे आजही मुख्यमंत्री

शिवसेनेने मित्र पक्षाची चर्चा न करता असे वाक्तव्य करणे योग्य आहे का?, यावर जयंत पाटील म्हणाले, “आता हे गुवाहाटीला गेलेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. गुवाहाटीमधील आमदारांनी पक्ष सोडून जावू असे कोणतेही विधान त्यांनी केलेले नाही. त्यामुळे ते गुवाहाटीवरून मुंबईला आले. तर त्यांची बैठक होत असेल आणि त्यांनी पक्षाच्या अंतर्गत चर्चा केली. तर त्यानंतर पाहू, त्यावर आज भाष्य करणे मला आवश्यक आहे, असे वाटत नाही.” शिवसेना ही बॅकफूटवर गेली का? जयंत पाटील म्हणाले, “वर्षा सोडून मातोश्रीवर जाणे. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. सध्याची परिस्थिती बघून त्यांनी तो निर्णय घेतला. याचा अर्थ ते आजही मुख्यमंत्री आहेत. मातोश्रीवर राहून ते काम करतील.”

 

संबंधित बातम्या
शिवसेनेने ‘मविआ’मधून बाहेर पडावे असे वाटत असेल तर…!

 

Related posts

“महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल”, शरद पवारांचा विश्वास

Aprna

शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk