HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीला लोकसभेत दोन अंकी आकडा गाठणे शक्य नाही !

मुंबई | “राष्ट्रवादीला लोकसभेत दोन अंकी आकडा गाठायचा आहे, पण ते शक्य नाही. खरं तर शरद पवारांच्या वयाचा विचार करता त्यांनी आता लोकसभा निवडणुकीला उभं राहू नये, असे मी म्हटले होते. माझ्या या वक्तव्याचा शरद पवारांना राग आला. परंतु खरंतर त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे”,असे वक्तव्य महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. “शरद पवार यांचा आत्मविश्वास ढळला आहे म्हणूनच ते माढ्यातून लढण्याचा विचार करत आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुलगी सुप्रिया सुळे, नातू पार्थ पवार हे पवार कुटुंबातील ३ जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. राजकारणात सगळे पत्ते एकदम उघडायचे नसतात. आधी त्यांना रिंगणात उतरू दे, मग आमचा उमेदवार कोण असेल ते सांगतो, असे सूचक विधान यावेळी चंद्रकांत पाटील केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात !

News Desk

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk

पालघर लोकसभा पोटनिवडणुक निकाल अपडेट

News Desk